
देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…

आज संकष्टी चतुर्थी
आजच्या या मंगल दिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धी विनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपति बाप्पा मौर्या

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!